White Hair Tips : पांढरे केस होण्यापासून टाळण्यासाठी करा या ५ नैसर्गिक उपायांचा वापर, होईल फायदा
कमी वयामध्ये तुमचेही केस पांढरे होऊ नयेत यासाठी तुम्ही खालील नैसर्गिक उपायांचा वापर करू शकता. हे नैसर्गिक उपाय तुमचे केस काळे करण्यास मदत करतील.

White Hair Tips : आजकाल तरुण वयामध्येच अनेकांचे केस पांढरे होणे आणि केस गळतीच्या अनेक समस्या समोर येत आहेत. याला कारणीभूत ठरत आहे चुकीची जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या पद्धती. पोषक तत्वांचा अभावामुळे अनेकांचे केस लवकरच पांढरे होत आहेत.
आजकाल अनेकजण चुकीच्या उत्पादनाचा वापर करत आहेत. या उत्पादनामध्ये केमिकल असल्याने अनेकांना केसाच्या समस्या उद्भवत आहेत. काहींचे केस पांढरे होत आहेत तर काहींचे केस गळतीचे प्रमाण वाढलेले आहे.
तसेच हे पांढरे झालेले केस लपवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने वापरण्यास सुरुवात करतात. त्यामुळे केस आणखीनच पांढरे होतात. तसेच त्वचेलाही अनेक समस्या उद्भवतात.
प्रत्येकाला काळे आणि लांब केस हवे असतात. त्यामुळे ते वेगवेगळे उपाय करून पाहतात. मात्र त्यांचे केस काळे होत नाहीत. पण जर तुमचे केस वेळेआधीच पांढरे होण्यासपासून थांबवायचे असतील तर तुम्ही काही नैसर्गिक उपाय करून केस पांढरे होण्यापासून रोखू शकता.
काळा अक्रोड
तुमचेही केस कमी वयामध्ये पांढरे झाले असतील तर तुम्ही काळे अक्रोड केस काळे करण्यासाठी वापरू शकता. अक्रोडपासून केस काळे करण्यासाठी तुम्हाला त्याच्या सालीची पावडर करावी लागेल. अक्रोडच्या सालीची पावडर कोमट पाण्यात भिजवून केसांना लावावी.
केसांना लावलेली ही पावडर 1 ते 2 तासांनंतर स्वच्छ पाण्याने धुवून काढा. असे केल्याने तुमचे केस काळे होऊ शकतात. तसेच केस पांढरे होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही बदामाचे देखील सेवन करू शकता.
आवळा पावडर
तुम्हाला केस काळे करायचे असतील तर तुम्ही देखील आवळा पावडर वापरू शकता. यासाठी 2 चमचे आवळा पावडर 3 चमचे खोबरेल तेल घालून गरम करा. आणि हे मिश्रण काळे होईपर्यंत गरम करा. थंड झाल्यानंतर ते केसांना लावा आणि स्वच्छ पाण्याने केस धुवून काढा.
मेंदी पावडर
मेंदीच्या वापराने देखील तुम्ही तुमचे पांढरे झालेले केस काळे करू शकता. मेंदीचा वापर करताना मेंदी पावडर, कॉफी पावडर, लिंबाचा रस आणि गरम पाणी एकत्र करून त्याचे मिश्रण तयार करा. हे मिश्रण केसांना १ तास लावा आणि स्वच्छ पाण्याने ते धुवून काढा. ज्यामुळे तुमचे केस पांढरे होण्यापासून वाचतील.
तिळाचे तेल
केसांना तिळाचे तेल खूप फायदेशीर मानले जाते. तसेच या तेलापासून केसांना खूप मजबुती येत असते. तिळाच्या तेलाने केस आणि टाळूची मालिश करा. हे ऑलिव्ह, मोहरी किंवा बदामाच्या तेलात देखील मिसळून तुम्ही केसांना लावू शकता.
तुमचेही केस कमी वयामध्ये पांढरे होऊ नयेत यासाठी तुम्ही वरील नैसर्गिक उपाय करू शकता. ज्याने तुमचे केस पांढरे होण्यापासून वाचतील आणि केसांना चांगली मजबुती मिळेल.