ताज्या बातम्या

मोफत रेशन कोणाला, कसे आणि किती काळ मिळणार? ही योजना नेमकी काय आहे ?

केंद्र सरकारने (Central Government) अर्थात मोदी सरकाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (Pradhan Mantri Garib Kalyan Ann Yojana) आता सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. या (मोफत रेशन योजने) अंतर्गत, देशभरातील सुमारे 80 कोटी शिधा पत्रिकाधारकांना सप्टेंबर 2022 पर्यंत मोफत रेशन (Free Ration Scheme) मिळणार आहे.

लॉकडाऊननंतर मार्च 2020 मध्ये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश एकच होता, तो म्हणजे कोरोना महामारी (कोविड-19) मुळे निर्माण होणारा नागरिकांवरील ताण कमी करणे हा त्या योजनेमागचा हेतू होता. प्रारंभी ही योजना ही योजना एप्रिल-जून 2020 या कालावधीसाठी सुरू करण्यात आली होती, मात्र त्यानंतर 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे.

या योजनेची ही माहिती मिळाल्यानंतर आता तुम्हाला नक्की वाटत असणार की, आणि मनात अनेक प्रश्नही उपस्थित झाले असतील की, यो योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो, कोणाला मिळू शकतो आणि कसा घ्यायचा. आणि असंही वाटू शकतं की, या योजनेतील रेशन आपल्यालाही मिळू शकेल का.? म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या योजनेविषयी माहिती सांगणार आहोत.

सप्टेंबर 2022 पर्यंत मोफत रेशन
मोदी सरकारने आता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी सहा महिन्यांसाठी वाढवला आहे. या अंतर्गत, देशभरातील सुमारे 80 कोटी शिधा पत्रिकाधारकांना आता सप्टेंबर 2022 पर्यंत मोफत रेशन मिळत राहणार आहे.

या योजनेचा फायदा कोणाला आणि कसा मिळतो
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत, भारतातील सुमारे 80 कोटी शिधा पत्रिकाधारकांना प्रति सदस्य दरमहा 5 किलो अधिक धान्य (गहू-तांदूळ) मिळते. भारतातील ज्या नागरिकाकडे शिधापत्रिका उपलब्ध आहे, त्यांना या योजनेंतर्गत दरमहा 5 किलो अतिरिक्त रेशन त्यांच्या कोट्यातील रेशनसह मिळते. मात्र हे धान्य हे मिळत असताना शासनाकडून ज्या रेशन दुकानातून रेशन कार्ड मिळाले आहे, त्याच दुकानातून तुम्हाला धान्य मोफत मिळणार आहे.
तसेच ही योजना फक्त कार्ड धारकांसाठीच असणार आहे, ज्यांच्याकडे रेशन नसेल त्यांना हे मोफत धान्य मिळणार नाही. भारतात 80 कोटींहून अधिक रेशनकार्ड धारकांची संख्या आहे.

मोफत रेशन मिळत नसेल तर अशी करा तक्रार
देशातील 80 कोटींहून अधिक रेशनकार्ड धारकांना या कार्डवर मोफत धान्य मिळते. तरीही तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि रेशन विक्रेता दुकानदार या योजनेअंतर्गत तुमच्या कोट्यातील धान्य देण्यास तुम्हाला नकार देत असेल तर तुम्ही टोल फ्री क्रमांकावर तक्रार करु शकता. राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टल (NFSA) वर प्रत्येक राज्यासाठी हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.

तसेच तुम्ही ऑनलाईन तक्रारही दाखल करु शकता, त्यासाठी तुम्ही NFSA ची वेबसाइट https://nfsa.gov.in या वरुन तुम्ही तुमची तक्रार ई-मेलद्वारे नोंदवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button