अहमदनगर

मी जेलमध्ये असताना तुम्ही मला भेटायला का आले नाहीत… म्हणत बापलेकांवर कोयत्याने वार

राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे एक अत्यंत धक्कादायक घाटना घडली आहे. मी जेलमध्ये असताना तुम्ही मला भेटायला का आले नाहीत? असे म्हणून दोघा बापलेकांना दीपक नवले याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

या घटनेत हरिभाऊ नवले हे जखमी झाले असून त्यांच्यावर राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान याप्रकरणी हरिभाऊ तात्याबा नवले, वय 46 वर्षे, रा. कोंढवड, ता. राहुरी यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, हरिभाऊ नवले व त्यांचा मुलगा कोंढवड येथील त्यांच्या घरासमोर होते.

त्यावेळी आरोपी दीपक भीमराज नवले हा दारू पिऊन तेथे आला. आरोपी नवले यांच्या मुलास म्हणाला, मी राहुरीच्या जेलमध्ये असताना तुम्ही मला भेटायला का आले नाहीत? असे म्हणून त्याने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तेव्हा हरिभाऊ नवले हे भांडण सोडविण्यासाठी आले असता आरोपी दीपक नवले याने त्यांच्यावर कोयत्याने वार केला. या घटनेत हरिभाऊ नवले हे जखमी झाले असून त्यांच्यावर राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान याप्रकरणी हरिभाऊ नवले यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी दीपक भीमराज नवले रा. कोंढवड, ता. राहुरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button