लेटेस्ट

या देशात बनवली जातेय मानवी मूत्रापासून बिअर ! जाणून घ्या सविस्तर

मद्यपान करणाऱ्या अनेकांना बिअर पिणं आवडतं. पण बिअर व्यक्तीच्या मुत्रापासून बनते असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? पण हे खरं आहे. कंपनी व्यक्तीच्या मुत्रापासून बिअर बनवते. ही एक नवी कॉन्सेप्ट असून अनेकांना याबाबत कोणतीही माहिती नाही.

एका रिपोर्टनुसार, या कंपनीने युरोपातील एका म्युझिक कॉन्सर्टमधून व्यक्तीचं ५० हजार लीटर युरिन एकत्र केलं होतं. त्यानंतर त्यांनी आपली बिअर लाँच केली होती. बिअरमध्ये व्यक्तीच्या मुत्राचा वापर केला जातो. यावर मोठी प्रक्रिया केली जाते.

या बिअरमध्ये युरिनप्रमाणे जराशी टेस्ट जरी असेल, तर आम्ही हे बंद करू, परंतु तुम्हाला याबाबत जराही समजणार नाही, अशा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. रिसायकल बिअर ही एक चांगली कल्पना आहे, असं आम्हाला वाटतं.

म्हणूनच व्यक्तीच्या मुत्रापासून रिसायकल-पुनर्वापरयोग्य बिअर बनवण्याचं ठरवलं, असं कंपनीने म्हटलं होतं. अशाप्रकारे बिअर तयार केली जाण्याची ही कल्पना डेन्मार्कमध्ये  उदयास आली.

डेन्मार्कच्या कृषी आणि खाद्य परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, ह्युमन वेस्टचा इतक्या मोठ्या प्रमाणात फर्टिलायझर रुपात वापर करणं हा एक नवा कॉन्सेप्ट आहे. याला beercycling असं म्हटलं जातं.

हे एक ट्रेंडी, टिकाऊ पेय ठरू शकतं, ही चांगली कल्पना असून ही भविष्यातील गुंतवणूक ठरू शकते, असंही ते म्हणाले. तसंच सध्या फॉस्फरसची कमतरता आहे,

त्यामुळे अशा कल्पनेतून ते वर्तुळ पूर्ण होईल, असंही कंपनीने म्हटलं आहे. याची चव चांगली असल्याची प्रतिक्रियाही ही बिअर पिणाऱ्या काही व्यक्तींनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button