शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लघवी करणं का आहे गरजेचं? जाणून घ्या काय

एका विशिष्ट वयानंतर शरीर आणि मानसिक आरोग्यासाठी शारीरिक संबंध निर्माण करणे महत्त्वाचे असते. तसेत प्रत्येक नवरा-बायकोमध्ये देखील हे होणे सहाजीकच आहे.
परंतु हे करताना स्वच्छतेची काळजी घेणं देखील महत्वाचं. बरेच लोक अपूऱ्या ज्ञानामुळे शारीरीक संबंधानंतर शरीराच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नाहीत किंवा महत्वाचं समजत नाही, ज्यामुळे पुढे जाऊन त्यांना समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सेक्स करताना काही खबरदारी घेणे चांगले.
तज्ज्ञांचे मत आहे की शारीरिक संबंध ठेवल्यानंतर महिलांसाठी लघवी करणे खूप महत्वाचे आहे, पण हे कशासाठी? यामागचं कारण जाणून घ्या.
शारीरिक संबंधानंतर लघवी करावी?
शारीरिक संबंधानंतर महिलांनी लघवी करणे महत्त्वाचे असते, कारण त्यांचे मूत्रमार्ग लहान असते आणि येथे बॅक्टेरिया पसरण्याची शक्यता जास्त असते. पुरुषांबद्दल बोलायचे झाले तर, सेक्स करताना त्यांच्या लघवीमध्ये असलेले बॅक्टेरिया महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सहज प्रवेश करतात. ज्यामुळे महिलांनी लघवी करणं फार गरजेचं आहे. एवढंच काय तर प्रत्येक वेळी लघवीची जागा धुणे देखील तेवढेच महत्वाचे आहे.
महिलांसाठी संसर्गाचा धोका
शारीरिक संबंधानंतर महिलांना अनेकदा संसर्ग होण्याचा धोका असतो, कारण या काळात मूत्रमार्गात बॅक्टेरिया पसरतात. परंतु 30 मिनिटांच्या आत लघवी करून नंतर जागा स्वच्छ केल्याने हा धोका बर्याच प्रमाणात कमी होतो.
पुरुषांसाठी लघवी करणे किती महत्त्वाचे आहे?
शारीरिक संबंध ठेवल्यानंतर पुरुषांना लघवी करणे फारसे शक्य नाही. कारण त्यांचा मूत्रमार्ग महिलांपेक्षा जास्त लांब असतो, त्यामुळे सेक्स करताना संसर्ग होण्याचा विशेष धोका त्यांना नसतो. अशा परिस्थितीत लघवी करायची की नाही, हा तुमचा निर्णय आहे.
गर्भधारणा टाळणे किती खरे आहे?
शारीरिक संबंधानंतर लघवी करून गर्भधारणा टाळल्याची चर्चा पूर्णपणे खोटी आहे. महिलांना गर्भधारणा टाळायची असेल, तर सुरक्षित सेक्सचा मार्ग निवडावा लागेल. गर्भधारणेसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुक्राणू व्हल्व्हातून फॅलोपियन ट्यूबमध्ये पोहोचतात, परंतु स्त्रियांचा मूत्रमार्ग वेगळा असल्याने, लघवीचा आणि गर्भधारणेचा काहीही संबंध नाही.
लघवी करताना जळजळ?
शारिरीक संबंधानंतर महिलांना लघवी करताना जळजळ जाणवत असेल, तर हा युरिन इन्फेक्शन समजू नका, ही समस्या 2 ते 3 दिवसात स्वतःच बरी होऊ शकते, परंतु बराच वेळ जळजळ जाणवत असेल, तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.