अहमदनगर

महापुरुषांचे पुतळे उभारण्यास मनपा प्रशासनास ऍलर्जी का ? – नगरसेवक कुमारसिंह वाकळे

अनेक वर्षांपूर्वी मनपा सर्वसाधारण सभेमध्ये महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी महासभेत ठराव करून दिला असतानाही प्रशासन दिरंगाई का करत आहे महापुरुषांचे पुतळे उभारण्यास मनपा प्रशासनास ऍलर्जी का ?

असा प्रश्न नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी मनपाच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला आहे. येत्या एक महिन्याच्या आत शहरातील विविध ठिकाणी महापुरुषांचे पुतळे न उभारल्यास आम्ही पुढाकार घेऊ असा इशारा सभेत नगरसेवक वाकळे यांनी दिला आहे.

महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा, प्रोफेसर कॉलनी चौक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती बसविण्याचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे

यांच्यासह शहरातील आदी महापुरुषांचे पुतळे एक महिन्यात न बसवल्यास आम्ही स्वतः पुढाकार घेऊन हे सर्व थोर महापुरुषांचे पुतळे बसव असा इशारा नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी सर्वसाधारण सभेत मनपा प्रशासनास दिला आहे.

तसेच बोल्हेगाव फाटा ते बोल्हेगाव गावठाण पर्यंतच्या रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नामकरण करावे याच बरोबर काकासाहेब म्हस्के हॉस्पिटल समोरील मनपाच्या आरोग्य केंद्रास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नामकरण दयावे अशी मागणी देखील नगरसेवक वाकळे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button