ताज्या बातम्याश्रीरामपूरसंगमनेर

असा नवरा नको ग बाई ! महिलेसोबत अश्लील फोटो पाहून पत्नी पोलीस ठाण्यात…

संगमनेर तालुक्यातील एका कृषी पर्यवेक्षकाचे त्यांच्या ग्रुपवर कार्यालयीन महिलेसोबत काही अश्लील फोटो पडले. सदर फोटो थेट पत्नीपर्यंत पोहचले.

यातुन दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १६) दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील एक कृषी पर्यवेक्षकाचा काही दिवसांपूर्वी शिक्षक महिलेबरोबर विवाह झाला होता.

त्यांचा संसार सुरळीत सुरु असताना कृषी पर्यवेक्षकाचा कार्यालयातील एका महिलेसोबत चॅटिंग सुरू झाली. हा कृषी पर्यवेक्षक वारंवार वादग्रस्त ठरला. तीन वर्षांपूर्वी याच कृषी पर्यवेक्षकाने सोशल मिडीयाच्या ग्रुपवर अश्लील व्हिडीओ टाकले होते.

त्यावेळी तत्कालीन तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्या घटनेवर पडदा टाकला होता. त्यानंतर पुन्हा दीड वर्षांपूर्वी कार्यालयीन अधिकृत ई-मेलवर अश्लील व्हिडीओ टाकले होते. तेव्हा चौकशी देखील झाली होती.

तरी कुठलीही कारवाई झाली नाही. ही तक्रार तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नगर व विभागीय कृषी सहसंचालक, पुणे येथे केली होती.

त्यानंतर विशाखा समितीने चौकशी देखील केली होती. तो चौकशी अहवाल विभागीय कृषी सहसंचालक, पुणे येथे सादर केला आहे. इतके सर्व असताना या कृषी पर्यवेक्षकाने काल पुन्हा आपलेच अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकले आहे.

पती-पत्नीत झालेला हा वाद थेट शहर पोलीस ठाण्यात येऊन ठेपला. यात कृषी पर्यवेक्षकाच्या पत्नीने थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठुन कृषी पर्यवेक्षक पतीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी यांनी वरिष्ठ कार्यलयात चौकशी प्रस्ताव पाठविला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button