अवजड वाहतुकीचा ताण होणार कमी; ‘तो’ बाह्यवळण रस्ता अखेर वाहतुकीसाठी खुला

दोन वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केलेला सराईत गुन्हेगार अहमद अब्बास पठाण (वय 45 रा. कापुरवाडी ता. नगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वारूळवाडी (ता. नगर) शिवारातील मिरावली पहाड येथून अटक केली.
त्याच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दिनेश मोरे यांनी फिर्याद दिली आहे. पठाण याच्याविरूध्द विविध गुन्हे दाखल आहेत.
त्याला अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावे असा अहवाल भिंगार कॅम्प पोलिसांनी अहमदनगर विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी त्यावर निर्णय देत आरोपी पठाण याला 28 फेब्रुवारी, 2022 रोजी दोन वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले होते.
आरोपी पठाण हा मंगळवारी मिरावली पहाड येथे आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानुसार कटके यांनी पथक नियुक्त करून आरोपीला अटक करण्याच्या सूचना केल्या. पथकातील अधिकारी, अंमलदार यांनी आरोपी पठाण याला ताब्यात घेत अटक केली.