अहमदनगरलेटेस्ट

अहमदनगर जिल्ह्यात हा नवा तालुका होणार ? प्रस्ताव तयार…

महाराष्ट्रात जनावरांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या घोडेगाव तालुक्याची नव निर्मितीची मागणी २४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाकडे करण्यात आली होती.

वैरागर यांनी, त्यासाठी शासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्याने नाशिक विभागीय आयुक्तांनी नेवाशाच्या तहसीलदारांना प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. हा परिपूर्ण झालेला प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या समितीकडे पाठविला आहे.

नेवासा तालुक्याचे विभाजन करून घोडेगाव हा नवीन तालुका निर्मितीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या समितीकडे पाठविन्यात आला आहे.

विशेष म्हणजे प्रस्तावित नविन घोडेगाव तालुक्यात ५३ गावांचा समावेश करण्याची शिफारस प्रस्तावात असून नेवासा तालुक्यात ७४ गावांचा समावेश राहणार असल्याचा प्रस्ताव असल्याची माहिती सुधीर वैरागर यांनी दिली आहे.

ह्या तालुक्याचे होणार विभाजन पहा गावांची नावे

घोडेगाव तालुक्यात प्रस्तावित केलेल्या ग्रामपंचायत ठरावाची संपूर्ण प्रक्रिया नेवासा तहसीलदार, गटविकास अधिकारी, मंडलाधिकारी तलाठी, ग्रामविकास अधिकारी यांनी पूर्ण केलेली आहे.

तसेच भूमी अभिलेख यांनीही आवश्यक शासकीय प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख राजपत्रित अधिकारी यांचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त केलेले असून

कामगार तलाठी यांचेकडून कडून १२७ गावाचे क्षेत्र, क्षेत्रफळ, शेतकरी जमीन महसूल याबाबत गावनिहाय माहिती अद्ययावत केलेली आहे

तसेच प्रस्तावित घोडेगाव तालुका निर्मितीने सर्वसामान्य जनतेचा वेळ, पैसा, श्रमात बचत होणार असल्याची शिफारस विशेष लक्षवेधी ठरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button