अहमदनगरलेटेस्ट

अहमदनगर जिल्हा विभाजनाअगोदर ह्या तालुक्याचे विभाजन होणार ? पहा सविस्तर माहिती

घोडेगाव तालुका निर्मिती या शासकीय संघर्षाच्या प्रवासात अनेक प्रसंग आले, ते कायम स्मरणात राहतील. तसेच शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर ऐवजी अहमदनगर जिल्ह्यात घोडेगाव तालुका निर्मितीची नोंद होईल, याचा आनंद आहे अशी माहिती सुधीर वैरागर यांनी दिली आहे.

असा सध्याचा नेवासा तालुका
२०११ च्या जनगणनेनुसार नेवासा तालुक्याची लोकसंख्या ३ लाख ५७ हजार ३२३ इतकी आहे. तालुक्यात ८ महसूल मंडल असून १२७ गावे आहेत. तालुक्याचे क्षेत्रफळ १ लाख ३४ हजार हेक्टर असून पूर्वेला शेवगाव तालुका, दक्षिणेला नगर तालुका, पश्चिमेला श्रीरामपूर तालुका तर उत्तरेला औरंगाबाद जिल्हा आहे.

अहमदनगर जिल्ह्यात हा नवा तालुका होणार ? प्रस्ताव तयार…

विभाजन झाल तर नेवासा तालुका –
विभाजनानंतर नेवासा तालुक्याची लोकसंख्या १ लाख ८१ हजार ६४२ इतकी राहिलं. त्यात नेवासा खुर्द, नेवासा बुद्रुक, सलाबतपूर व कुकाणा हे मंडल राहतील. या चार मंडलाचे क्षेत्रफळ ६५ हजार २१४ हेक्टर असेल. यात ७४ गावांचा समावेश असेल.

प्रस्तावित नवीन घोडेगाव तालुका –
प्रस्तावित नवीन घोडेगाव तालुक्याची लोकसंख्या १ लाख ७५ हजार ६८१ इतकी असेल. यात घोडेगाव, चांदा, सोनई, बहीरोबा ही मंडले असेल तर ६१ हजार २७१ हेक्टर क्षेत्रफळ असेल.

नेवासा तालुक्यातील गावे
नेवासा खुर्द, खुपटी, चिंचबन गोणेगाव, इमामपूर, मुकिंदपुर, मक्तापूर, पिचडगाव, म्हसले, खडका, बकु पिंपळगाव, मुरमे, खलाल पिंपरी, मडकी, प्रवरासंगम, टोका, वाशिम, म्हाळसापूर, माळेवाडी खालसा, उस्थळ दुमाला, हंडी निमगाव, बाभूळवेढा, नेवासा बुद्रुक, बेलपिंपळगाव, सुरेगाव गंगा, बेलपांढरी, बोरगाव, उस्थळ खालसा, गोधेगाव, धामोरी, भालगाव, बहीरवाडी, घोगरगाव, जैनपुर, पाचेगाव, पुनतगाव, सलाबतपुर, बाभुळखेडा, दिघी, जळके बुद्रुक, जळके खुर्द, गोगलगाव, गळनिंब, सुरेगाव, दहिगाव, मंगळापूर, खेडले काजळी, शिरसगाव, गिडेगाव, गोयेगव्हाण, वरखेड, रामडोह माळेवाडी दुमाला, खामगाव, गोपाळपूर, कुकाणा, तरवडी, अंतरवाली, वडूले, जेऊर हैबती, चिलेखनवाडी, देवसडे, सौंदाळा, भेंडा खुर्द, भेंदा बुद्रुक, गोंडेगाव, गेवराई, नजीक चिंचोली, सुलतानपूर, पाथरवाला, नांदूर शिकारी, सुकळी बुद्रुक, सुकळी खुर्द, वाकडी, पिंपरी शहाली.

अहमदनगर जिल्ह्यात हा नवा तालुका होणार ? प्रस्ताव तयार…

प्रस्तावित घोडेगाव तालुक्याची गावे
घोडेगाव, झापवाडी, मोरगव्हाण, लोहारवाडी, शिंगवेतुकाई, राजेगाव, मांडे गव्हाण, लोहगाव, मोरेचिंचोरे, वांजोळी, पानसवाडी, धनगरवाडी, वंजारवाडी, बेल्हेकरवाडी, शिंगणापूर, चांदा, रस्तापुर, कौठा, म्हाळस पिंपळगाव, देडगाव, देवगाव, शहापूर, फत्तेपूर, माका, महालक्ष्मी हिवरे, तेलकुडगाव, पाचुंदा, सोनई, खेडले परमानंद, शिरेगाव, अंमळनेर, निंभारी, करजगाव, पानेगाव, तामसवाडी, वाटापुर, गोमळवाडी, गणेशवाडी, लांडेवाडी, वडाळा बहीरोबा, माळीचिंचोरा, हिंगोणी, कांगोणी, बऱ्हाणपूर, खरवंडी, नारायणवाडी, धनगरवाडी, निपाणी निमगाव, रांजणगाव, नागापूर, कारेगाव, भानसहिवरे, खुणेगाव .

Related Articles

Leave a Reply

Back to top button