Wipro Record Date : ‘या’ शेअरमध्ये गुंतवणूक कराल तर लाखो कमवाल; जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेले संकेत…
तुम्ही या शेअरमध्ये गुंतवणूक करून भरपूर पैसे कमवू शकता. हा तुम्हाला लाखो रुपये कमवून देणारा शेअर आहे.

Wipro Record Date : शेअर बाजारातील अनेक कंपन्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देत असतात. मात्र गुंतवणूकदारांना या शेअरबद्दल माहित असणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमचा तोटा होणार नाही.
तसे तर शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे खूप जोखमीचे असते. मात्र गुंतवणूकदारांना शेअर्सबद्दल सर्वकाही माहित असणे गरजेचे असते. जर तुम्हाला बाजाराबद्द्दल सर्व ज्ञान असेल तर तुम्हाला पैसे कमवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही.
सध्या आम्ही तुम्हाला अशाच एका कंपनीबद्दल सांगणार आहे. या दिग्गज IT कंपनीचे नाव विप्रो आहे. विप्रोने त्यांचे शेअर्स परत खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी निश्चित रेकॉर्ड तारीख आज म्हणजेच 16 जून 2023 आहे.
कंपनीच्या या बायबॅकची साइज 12,000 कोटी रुपये आहे. तसे पाहिलं तर गुरुवारी विप्रोच्या एका शेअरची किंमत बाजार बंदच्या वेळी 1.93 टक्क्यांनी घसरल्यानंतर 388.95 रुपयांच्या पातळीवर बंद झाली होती.
विप्रो बायबॅक तपशील
1- कंपनीने बायबॅकसाठी 445 रुपये प्रति शेअर किंमत निश्चित केली आहे. गुरुवारच्या शेअरच्या किमतीच्या तुलनेत गुंतवणूकदारांना सुमारे 57 रुपयांचा फायदा होईल. म्हणजेच प्रत्येक शेअरवर 14.41 टक्के नफा अपेक्षित आहे.
2- विप्रोचे प्रमोटर आणि प्रमोटर गटाने या बायबॅकमध्ये सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत.
3- मार्च तिमाहीच्या अखेरीस प्रमोटर आणि प्रमोटर गटाकडे विप्रोचे 400.19 कोटी समभाग होते. त्यांची कंपनीतील एकूण हिस्सेदारी 72.92 टक्के होती.
4- विप्रोने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की बायबॅकद्वारे कंपनी आपली अतिरिक्त रक्कम गुंतवणूकदारांना वितरित करण्याचा विचार करत आहे.
5- विप्रोच्या बायबॅक प्लॅनमध्ये स्मॉल शेयर होल्डर्सकडे 15 टक्के राखीव रक्कम आहे.
शेअर बाजारात कंपनीची कामगिरी कशी आहे?
गेल्या वर्षभरात विप्रोच्या शेअर्सच्या किमती सुमारे 8 टक्क्यांनी घसरल्या आहेत. रिकव्हरीच्या दृष्टीने मागील एक महिना गुंतवणूकदारांसाठी चांगला गेला आहे. या कालावधीत, विप्रोच्या शेअरच्या किमतीत किरकोळ परंतु सकारात्मक 0.48 टक्के वाढ झाली आहे. BSE वर कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 450.65 रुपये प्रति शेअर आणि 52 आठवड्यांचा नीचांक 351.85 रुपये प्रति शेअर आहे.