Ahmednagar News : इंजिनीअरची पदवी घेऊन स्वतःचा पोल्ट्री उद्योग उभारला पण एका क्षणात झालं सर्व उधवस्त !
रविवारी (दि.१) दुपारी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान शुभम आणि त्यांचे वडील गोकुळ हे दोघे पोल्ट्री फार्मच्या शेडजवळ काम करीत होते. मात्र, शुभम यांच्या हातातील लोखंडी वीजवाहक तारांच्या मुख्य तारेला लागला.

जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील पोल्ट्री व्यावसायिक शुभम गोकुळ दाताळ (वय २४) यांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला, तर त्यांचे वडील गोकुळ दाताळ हेही या घटनेत जखमी झाले आहेत.
रविवारी (दि.१) दुपारी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान शुभम आणि त्यांचे वडील गोकुळ हे दोघे पोल्ट्री फार्मच्या शेडजवळ काम करीत होते. मात्र, शुभम यांच्या हातातील लोखंडी वीजवाहक तारांच्या मुख्य तारेला लागला.
त्यामुळे त्यांना जोरदार धक्का बसला असून ते खाली पडले. त्यांच्याजवळच उभे असलेले त्यांचे वडील यांना धक्का बसला अन् ते बाजूला फेकले गेले.
यात शुभम यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यामागे आई, वडील, आजी, एक भाऊ असा परिवार आहे. त्यांचे वडील जखमी झाले आहेत.
शुभम दाताळ हे इलेक्ट्रिक इंजिनीअरची पदवी घेऊन नोकरी न करता, स्वतःचा पोल्ट्री उद्योग चांगल्या पद्धतीने चालवित होते, लोणी फाट्याजवळील त्यांच्या शेतात त्यांनी १४ हजार कोंबड्यांचे मोठे वातानुकूलित शेड उभे केले होते.
आधुनिक तंत्रज्ञानाने कोंबड्यांना खाद्य वाटप, पाणी देणे, स्वच्छता ठेवून त्यांनी व्यवसायात मोठी प्रगती करण्यास सुरुवात केली होती. दुसऱ्या शेडच्या उभारणीचे काम हाती घेतले होते.