अहमदनगर

विनापरवानगीच त्याने पतसंस्थेच्या लॉकरमधून सोने केले लंपास; या ठिकाणची घटना

संगमनेर शहरातील शारदा नागरी पतसंस्थेच्या लॉकरमधून अडीच लाख रुपयांचे सोने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाजणाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शारदा नागरी पतसंस्थेच्या सोनेतारण लॉकरचा चार्ज संदीप नामदेव गुळवे याचेकडे होता. त्याने कोणाचीही परवानगी नसताना एकट्यानेच लॉकर उघडून त्यामधील बॅगत ठेवण्यात आलेले अडीच लाख रुपयांचे दागिने चोरून नेले.

याप्रकरणी व्यवस्थापक माधव भोर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संदीप नामदेव गुळवे (रा. कर्‍हे, ता. संगमनेर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. शेख करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button