उसने पैसे मागितल्याच्या कारणावरून महिलेस मारहाण

उसने दिलेले पैसे मागितल्याचा राग आल्याने राहुरी शहरातील महिलेस मारहाण केल्याप्रकरणी राहुरी पोलीस एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शुक्रवार 8 ऑक्टोबर रोजी दिली आहे.
गिता भगवान गुंजाळ (वय ४५ वर्षे राहणार राहुरी खुर्द) या महिलेले राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक ७ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान शहरातील कोहकडे हॉस्पिटल समोर असताना आरोपी नितीन साळवे हा तेथे दारू पिऊन आला.
तो म्हणाला मला दिलेले २५ हजार रूपये परत का मागते. असे म्हणून तो शिवीगाळ करू लागला. त्यावेळी त्यावेळी गिता गुंजाळ त्याला म्हणाल्या की, तू मला शिवीगाळ करू नको.
ही माझी कष्टाची कमाई आहे. तुला गरज असताना मी तुला पैशाची मदत केली होती. आता मला पैशाची गरज असल्याने तु मला माझे उसने दिलेले पैसे परत दे.
याचा राग येवुन आरोपी नितीन साळवे याने गिता गुंजाळ यांच्या डोक्यात वीट मारून जखमी केली. तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली.
घटनेनंतर गिता गुंजाळ यांनी राहुरी पोलिसात धाव घेऊन आरोपी नितीन दौलत साळवे राहणार राजवाडा, राहुरी. याच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय.