अहमदनगर

शेअर मार्केटच्या नावाखाली महिलेला फसवले; अशी केली फसवणूक

अहमदनगर- शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास ते डबल करून देण्याचे आमिष दाखवून सावेडी उपनगरातील एका नोकरदार महिलेची दोन लाख 52 हजार 385 रूपयांची फसवणूक झाली आहे. त्या महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सुरज राजू मोढवे (रा. वाकोडी ता. नगर) याच्याविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिला नागापूर एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरीला असताना त्या कंपनीत काम करणारा सुरज मोढवे याच्यासोबत त्यांची ओळख झाली होती. त्याने फिर्यादी यांच्या विश्‍वास संपादन करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखविले होते.

 

फिर्यादी यांनी त्यांच्या फोन पे यूपीआयव्दारे मोढवे याच्या नंबरवर 52 हजार 385 रूपये पाठविले, तसेच फिर्यादी यांनी मोढवे याला रोख दोन लाख रूपये दिले होते. असे एकुण दोन लाख 52 हजार 385 रूपये फिर्यादी यांनी मोढवे याला दिले होते. सदरची रक्कम 15 जानेवारी, 2022 ते 20 जानेवारी, 2022 दरम्यान देण्यात आली होती.

 

दरम्यान मोढवे याने फिर्यादी यांच्या नावे शेअर मार्केटमध्ये कुठलीही गुंतवणूक न करता त्यांची फसवणुक केली आहे. तसेच दिलेले पैसे परत न केल्याने फिर्यादी यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button