महिला विकत होत्या हातभट्टी; पोलिसांनी मारला छापा अन्

वरिष्ठांच्या आदेशानुसार हातभट्टी दारू अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) छापेमारी सुरू केली आहे. आलमगीर (ता. नगर) येथील मोरे वस्तीवर दोन ठिकाणी छापे टाकले.
या प्रकरणी दोन महिलेला ताब्यात घेत 25 हजार 500 रूपयेे किंमतीची दारू व रसायन जप्त केले आहे. त्यांच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अंमलदार बबन मखरे व सचिन आडबल यांनी स्वतंत्र फिर्यादी दिल्या आहेत. सुनंदा संतोष पवार व विद्या लहू पवार (दोघी रा. मोरे वस्ती, आलमगीर) अशी हातभट्टी दारू तयार करून विक्री करणार्या महिलांची नावे आहेत.
आलमगीर येथील मोरे वस्तीवर हातभट्टी दारू निर्मिती केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.
त्यांनी एक पथक स्थापन करून सदर ठिकाणी कारवाई करण्याच्या सुचना केल्या. पथकाने रविवारी सकाळी नमूद ठिकाणी छापे टाकले असता दोन्ही ठिकाणी महिला हातभट्टी तयार करताना मिळून आल्या. अधिक तपास भिंगार कॅम्प पोलीस करीत आहेत.