लेटेस्ट

फरशीवर पिवळे डाग पडलेत? काळजी करू नका ‘या’ टिप्स वापरा

अनेकदा बरेचजण घरातील फरशी पिवळी झाल्यामुळे खूपच वैतागतात. या समस्येवर मात करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्सबाबत सांगणार आहोत. याच्या मदतीने तुमच्या घरातील फरशी पांढरी व चकचकीत होऊ शकते.

चला जाणून घेऊयात फरशी चकचकीत कशी करावी

पाण्याच्या बादलीत लिंबाचा रस मिसळून तयार केलेल्या मिश्रणाने स्वच्छ करावा. असे केल्याने फरशी चकचकीत तर करता येतेच पण पिवळसरपणा दूर करता येतो.

फरशी चकचकीत करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा देखील वापरू शकता. अशा वेळी तुम्ही पाण्याच्या मगमध्ये बेकिंग सोडा पावडर मिक्स करून त्यात सुती कापड भिजवून स्वच्छ करा. त्याचबरोबर चट्टेही काढता येतात.

पाण्याच्या मगमध्ये रॉकेल मिसळून सुती कापड भिजवून त्याचे डाग स्वच्छ करा. ते स्वच्छ केल्यानंतर फरशी गरम पाण्याने धुऊन घ्या. असे केल्याने फरशी स्वच्छ होऊ शकते.

या गोष्टींची विशेष काळजी घ्या…
फरशी अ ॅसिडने साफ करू नका अन्यथा फरशी खराब होऊ शकते.
जेव्हा जेव्हा फरशी स्वच्छ कराल तेव्हा रबरी हातमोजे घाला.
फारशी जाड कापडाने पुसून घ्या. हलके कपडे लवकर खराब होऊ शकतात आणि स्वच्छही निघणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button