ओ भाऊ ! तुमचे पैशे तुम्हालाच राहूद्या आम्ही काय जमीन देणार नाय… होय हे खरंय पुण्यात ह्या ठिकाणी जमिनीला मिळतायेत १० कोटी एकर…

पुणे जिल्ह्यातील अनेक भागात मोठमोठे प्रकल्प होत आहेत. त्यामुळे जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. साधारण बागायती तसेच नियोजित प्रकल्प आणि महामार्गालगत असलेल्या जमीन मालकांना सोन्याचे दिवस आले आहेत.
या जमिनींच्या किमती १० कोटीपर्यंत गेल्या असल्याचे समोर आले आहे. दरम्यान,डोंगरी आणि कोरडवाहू जमिनीला अपेक्षित असा भावच मिळत नसल्याचे चित्र आहे. पुण्याला लागून असलेल्या हवेली तालुक्यात पैसे देऊनही जमिनी उपलब्ध नसल्याचे दिसत आहे.
तुमच्या गावातील तालुक्यातील जमिनीचे सरकारी भाव कसे पाहायचे ?
जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांमुळे निश्चितच जमिनीच्या भूसंपादनासाठी कोट्यवधीची रक्कम बाधितांना देण्यात येत आहे. याशिवाय प्रकल्पाच्या आजुबाजूला आणि विशेष करून महामार्गालगत असलेल्या शेतजमिनींचे दर गगनाला भिडले आहेत, कोरोनानंतर खेड तालुक्यात जमिनींच्या दरात १० ते १५ टक्के वाढ झाली आहे.
जमिनीचे एकरी भाव
जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते प्रकल्प राबविण्यात येत आहेत त्यामुळे या रस्त्यालगत तसेच नदीकाठी असलेल्या जमिनींचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पाच वर्षांपूर्वी राजगुरूनगर परिसरात एकरी साडेतीन कोटी रुपये दर होता, तो सध्या चार कोटीवर गेला आहे.
तर चाकण परिसरात महामार्गाच्या कडेला चार कोटी रुपये दर होता, तो आता पाच कोटींच्या आसपास आहे. तर बारामती, इंदापूर, दौंड, हवेलीसह. अन्य तालुक्यातील बागायती जमिनीला ४० लाखापासून ते दीड ते दोन कोटी रुपये एकर भाव मिळत आहे. दिवसेदिवस या भावांमध्ये वाढ होत चालली आहे.
हवेली, खेड, दौंड , शिरुर, जुन्नर तालुक्यामध्ये महामार्ग अथवा मुख्य रस्त्याकडेला असलेल्या जमिनींचा एकरी भाव 10 कोटीपर्यंत पोहोचला आहे, त्यातच एखाद्या प्रकल्पासाठी जर जमिनी भसंपादित करायची असेल
तर त्या जमीन मालकाला मिळणारा मोबदला हा एकरी चार ते पाच कोटीपेक्षाही अधिक आहे. तर भोर , वेल्हे आणि आंबेगावसारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागात जमिनीला अपेक्षित असे भाव मिळत नाहीत.
तुमच्या गावातील तालुक्यातील जमिनीचे सरकारी भाव कसे पाहायचे ?