लेटेस्ट

अशी भन्नाट कार तुम्ही पहिली नसेल… जिची गिनिज बुकने घेतली दखल

आज आपण जगातील सर्वांत लहान कारबद्दल जाणून घेऊया. या अनोख्या कारचे नाव Peel P50 आहे जी फक्त १३४ सेमी लांब, ९८ सेमी रुंद आहे, तर तिची उंची फक्त १०० सेमी आहे.

त्याच्या मालकाचे नाव अ‍ॅलेक्स ऑर्चिन आहे. कारचे फीचर्स आणि किंमत ही कार ४.५ हॉर्सपॉवर इंजिनने सुसज्ज आहे आणि ती एक लिटर पेट्रोलमध्ये ४२ किमी चालवली जाऊ शकते.

नवीन पी५० ची किंमत ८४ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, म्हणूनच त्याने सेकंड हँड पी५० खरेदी केली. या कारचा कमाल वेग ३७ किमी प्रतितास आहे. ही कार चालवणाऱ्या अलेक्सचे म्हणणे आहे की, कारचा आकार पाहून लोक त्याची चेष्टा करतात.

मात्र या कारसाठी होणार पेट्रोलचा खर्च इतर गाड्यांपेक्षा खूपच कमी आहे. अ‍ॅलेक्सची उंची सुमारे ६ फूट आहे, त्यामुळे त्याला एवढ्या लहान कारमध्ये बसताना किंवा कारमधून खाली उतरताना पाहून लोक थक्क होतात.

परंतु अ‍ॅलेक्स त्याच्या कारच्या मायलेजमुळे खूप खूश आहे. पील इंजिनिअरिंग नावाची कंपनी ही कार बनवते. प्रथम ही कार १९६२ ते १९६५ दरम्यान बनवण्यात आली होती, नंतर २०१० पासून तिचे उत्पादन पुन्हा सुरू करण्यात आले.

२०१०मध्ये या कारला जगातील सर्वात लहान कार म्हणून घोषित करण्यात आले असून या कारचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button