अहमदनगर

तू मला फार आवडेस असे म्हणत शाळेसमोरच विद्यार्थिनीचा विनयभंग

जिल्ह्यात महिला अत्याचार, छेडछाड, विनयभंग अशा घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. यामुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे.

यातच अशीच एक धक्कादायक घटना जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. श्रीरामपूर शहरातील एका महाविद्यालयाच्या गेटसमोर विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील एका महाविद्यालयाच्या गेटसमोर 16 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला तू मला फार आवडेस असे म्हणून अल्पवयीन मुलाने शरीराला स्पर्श करून विनयभंग केला.

दरम्यान याबाबत विद्यार्थिनीने तिच्या बहिणीला सांगितले असता अल्पवयीन पीडित विद्यार्थिनीच्या बहिणीच्या तोंडात चापट मारून शिवीगाळ केली.

दरम्यान, विद्यार्थिनीने स्वत: श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येेथे जाऊन फिर्याद दिली. त्यावरून सुभेदारवस्ती भागातील अल्पवयीन मुलाविरूद्ध शहर पोलिसांत पोक्सो कायदा कलम 12 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button