अहमदनगर
पती घरी नसताना शेजारी राहणारा तरूण विवाहितेच्या घरात घुसला अन्

अहमदनगर शहरात भाडेकरू म्हणून राहतात असलेल्या एका तरूणाने शेजारीच भाडेकरून म्हणून राहत असलेल्या विवाहितेचा घरात घुसून विनयभंग केला.
तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसीम (पूर्ण नाव माहिती नाही, मुळ रा. जेऊर ता. नगर) असे तरूणाचे नाव आहे. पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी व वसीम हे दोघे अहमदनगर शहरात शेजारी शेजारी भाडेकरू म्हणून राहतात. शनिवारी रात्री फिर्यादी यांचे पती घरी नसताना वसीम याने फिर्यादीला शिवीगाळ केले. बळजबरीने त्यांच्या घरात घुसून गैरवर्तन करून विनयभंग केला.
झालेला प्रकार फिर्यादीने पतीला सांगितला असता त्यांनी वसीमला फोन केला असता त्याने शिवीगाळ करत,‘नालेगावमध्ये ये तूला जीवे मारून टाकतो,’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.