अहमदनगर

महिलेला तरूणाने व्हाट्सअपवर पाठविले अश्‍लिल मेसेज अन् रेकॉर्डिंग; पुढे घडलं…

अहमदनगर- महिलेच्या मोबाईलवर वारंवार व्हाट्सअपवर अश्‍लिल मेसेज व रेकॉर्डिंग पाठविणार्‍या तरूणाला महिलेने चांगलाच धडा शिकविला आहे. मागील पाच महिन्यापासून सुरू असलेल्या या गैरकृत्याविरूध्द महिलेने पोलिसांत फिर्याद दिली आहे.

 

अश्‍लिल मेसेज व रेकॉर्डिंग पाठवून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करणार्‍या त्या तरूणाविरूध्द कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. जयश विजय जाधव (रा. निंभारी ता. नेवासा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.

 

20 एप्रिल, 2022 ते 13 सप्टेंबर, 2022 दरम्यान ही घटना घडली असून 13 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. नगर शहरात राहणार्‍या एका विवाहितेच्या मोबाईलनंबरवरील व्हाट्सअपवर जाधव याने त्याच्या मोबाईल नंबरवरील व्हाट्सअपवरून अश्‍लिल मेसेज व रेकॉर्डिंग पाठवून महिलेसोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

 

तसेच त्यांचे पती व मेव्हणे यांना फोन करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button