युवतीवर गॅरेजमध्ये अत्याचार; पीडिता गर्भवती, पोलिसांत गुन्हा

जालना जिल्ह्यातील 17 वर्षीय युवतीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. तिच्या ओळखीच्या व्यक्तीने हे कृत केले आहे. या प्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा जालना पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. पीडित युवतीने या प्रकरणी फिर्याद दिली असून नारायण सोपान रडे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
आरोपी हा पीडितेच्या ओळखीचा आहे. आरोपीनी पीडितेकडे मोबाईल नंबरची मागणी केली होती. त्यानंतर त्यांचे मोबाईलवर वारंवार बोलणे होत होते.
त्यानंतर आरोपीने त्याच्या गॅरेजमध्ये पीडितेला बोलावून घेतले आणि त्या ठिकाणी तिच्याशी बळजबरीने वारंवार अत्याचार केला. काही दिवसानंतर पिडीतेचे पोट दुखत असल्याने तपासणी केली असता पीडिता गर्भवती असल्याचे लक्षात आले.
पीडिता तिच्या मामासह नगरच्या स्नेहालय येथे गेली असता त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास सांगितले. आरोपीने लग्न करण्याचे आमिष दाखवून अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करून नंतर तो तपासासाठी जालना पोलिसांकडे वर्ग केला आहे.