अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग : युवकाची स्वतःला पेटवून घेत आत्महत्या

संगमनेर शहरातील नवघर गल्ली येथील प्रसाद लॉजमध्ये सागर रघुनाथ ठाकरे (वय ३५, धुळे) याने स्वतःला पेटवुन घेत आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी हि घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

ठाकरे प्रसाद लॉजमध्ये २८ मे पासून रूम घेऊन राहात होता. लॉजचे मालक अनिल बिल्लाडे यांना ठाकरे यांच्या रूममधून सकाळी जळण्याचा वास आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, उपनिरीक्षक निकिता महाले घटनास्थळी आले. रूमचा दरवाजा तोडला असता ठाकरे यांनी स्वतः ला पेटवून घेतले होते.

घटनास्थळी ठाकरे यांचे ओळखपत्र व चिट्ठी आढळली. ठाकरे व्हिजन वार्ताचे विस्तार अधिकारी म्हणून काम पाहत होते. अनिल बिल्लाडे यांच्या खबरी वरून शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. ठाकरे यांच्या परिवाराला घटनेची माहिती देण्यात आली. तपास निरीक्षक महाले करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button