Saturday, February 24, 2024
HomeअहमदनगरAhmednagar News : मिर्झापूरमध्ये शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

Ahmednagar News : मिर्झापूरमध्ये शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

Ahmednagar News : शेततळ्यातील पाण्याची पातळी पाहण्यासाठी गेला असता शेततळ्याच्या कागदावरून पाय घसरल्याने पाण्यात बुडून महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील मिर्झापूर गावात घडली.

अधिक माहिती अशी : तालुक्यातील मिर्झापूर येथील वसंत वलवे यांचा मुलगा स्वरूप मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरापासून जवळच असलेल्या शेततळ्यातील पाणी पातळी पाहण्यासाठी गेला होता. त्याचवेळी त्याचा कागदावरून पाय घसरून पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती समजताच त्याच्या नातेवाइकांनी शेततळ्याकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी कैलास भागुजी वलवे यांनी दिलेल्या खबरीवरून तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

पुढील तपास पोलिस निरीक्षक देविदास दुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राजेंद्र लांघे करत आहे.

दरम्यान, स्वरूप वलवे या तरुणाच्या मृत्यूने मिर्झापूर गावावर, तसेच वराळ कनिष्ठ महाविद्यालयासुद्धा शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments