अहमदनगर
Ahmednagar Crime : युवक बेपत्ता; वडिलांची पोलिसात धाव

Ahmednagar Crime ; केडगाव उपनगरातून एक युवक बेपत्ता झाला आहे. शुभम श्रावण कांबळे (वय 18) असे बेपत्ता युवकाचे नाव आहे.
या प्रकरणी त्याचे वडिल श्रावण देवराम कांबळे (रा. लोंढेमळा, केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
बेपत्ता झालेल्या शुभमचे वय 18 असून उंची चार फुट सहा इंच, रंगाने गोरा, शरीरयष्टी सडपातळ, डोक्याचे केस काळे, नाक सरळ, दात शाबुत, अंगात निळ्या रंगाचा शर्ट,
काळ्या रंगाची पॅन्ट, पायात काही नाही असे वर्णन आहे. त्याविषयी कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी कोतवाली पोलिसांशी संपर्क साधावा, असे आव्हान तपासी अधिकारी बी. एम. इखे यांनी केले आहे.