ZP Ahmednagar Bharti 2023 : अहमदनगर जिल्हा परिषदेत ९३७ पदांची भरती !
जिल्हा परिषदेची ही भरती प्रक्रिया राज्यभर आयबीपीएस ही कंपनी राबवणार आहे. याबाबत प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र जाहिरात निघणार असून या कंपनीच्या संकेतस्थळावर उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत.

ZP Ahmednagar Bharti 2023 :- महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची १९ हजार पदांची भरती १५ ऑगस्टआधी होण्याची चिन्हे आहेत. नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १९ संवर्गातील ९३७ पदे भरण्यात येणार आहेत. त्यात सर्वाधिक ७२७ पदे आरोग्य विभागाची आहेत.
गेल्या चार वर्षापासून पदभरती झाली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव— असंतोष आहे, राज्य सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार सरळसेवा कोट्यातील जागांची भरती करण्याची घोषणा केली आहे.
ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेने रिक्त जागांचा अंतिम आराखडा राज्य सरकारला पाठवला आहे. या आराखड्यानुसार जिल्हा परिषदेत सर्व विभागांच्या गट ‘क’ संवर्गातील ९२७ जागा भरण्यात येणार आहेत. ग्रामविकास विभाग पहिल्या टप्प्यात गट ‘क’मधील रिक्त पदांची भरती करणार आहे. त्यानंतर गट ‘ड’ मधील पदांचा विचार होऊ शकतो.
गट क संवर्गातील रिक्त जागांच्या ८० टक्के जागा भरण्यासाठी जिल्हा परिषदांना भरती प्रक्रिया राबविण्याची सूचना शासनाने केली होती. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांत सर्वच जिल्हा परिषदांनी बिंदुनामावलीनुसार रिक्त जागांचा अंतिम आराखडा ग्रामविकास मंत्रालयाकडे सादर केला आहे. त्यात नगर जिल्हा परिषदेची ९३७ पदे भरण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरापासून उमेदवार या भरतीची वाट पाहत आहेत.
जिल्हा परिषद भरती प्रक्रियेची सविस्तर जाहिरात जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, तसेच वर्तमानपत्रातदेखील संक्षिप्त स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येईल. ही भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आयबीपीएस एजन्सीमार्फत करण्यात येणार आहे.
प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र जाहिरात निघणार
जिल्हा परिषदेची ही भरती प्रक्रिया राज्यभर आयबीपीएस ही कंपनी राबवणार आहे. याबाबत प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र जाहिरात निघणार असून या कंपनीच्या संकेतस्थळावर उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. त्या दृष्टीने कंपनीने संकेतस्थळावर अर्ज भरण्याची तालीमही करून घेतली व येणाऱ्या अडचणी दूर केल्या आहेत
दोन वर्षांनी वयोमर्यादा वाढली
जिल्हा परिषद सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे शिथिलता देण्यात आलेली आहे.
या पदांची होणार भरती
■ सामान्य प्रशासन विभागात कनिष्ठ सहायक, लघुलेखक – एकूण १४ पदे.
■ अर्थ विभागाचे कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ सहायक (लेखा), कनिष्ठ सहायक (लेखा) २७ पदे.
■बांधकाम विभाग व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ अभियंता (विद्युत) व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या संवर्गाची एकूण ६४ पदे.
■ पशुसंवर्धन विभागाचे पशुधन पर्यवेक्षक या संवर्गाची ४२ पदे.
■ कृषी विभागाचे विस्तार अधिकारी (कृषी) १ पद
■ ग्रामपंचायत विभागाचे कंत्राटी ग्रामसेवक, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) ५६ पदे.
■ महिला व बालकल्याण विभाग मुख्य सेविका / पर्यवेक्षिका ६ पदे.
■ आरोग्य सेवक (पुरुष)
■ आरोग्य सेवक (महिला)
■ हंगामी फवारणी कर्मचारी
■ आरोग्य परिचारिका
■ औषध निर्माण अधिकारी व प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकूण ७२७ पदे.